शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात

By राजकुमार जोंधळे | Updated: July 12, 2024 22:52 IST

उज्ज्वलाबाई हरिश्चंद्र भुरकापल्ले (वय ४५, रा. येणगेवाडी) असे मयत महिलेचे नाव

राजकुमार जाेंधळे, हाळी-हंडरगुळी (जि. लातूर): उदगीर तालुक्यातील हाळी-रुद्रवाडी रस्त्यावर दुचाकीवरून घसरून पडलेल्या महिलेला बसने चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये महिला जागीच ठार झाली आहे. उज्ज्वलाबाई हरिश्चंद्र भुरकापल्ले (वय ४५, रा. येणगेवाडी) असे मयत महिलेचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (एम.एच. ४० एन ९१८६) शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चाकूर येथून बोरगाव मार्गे हाळी-हंडरगुळी गावाकडे येत होती. दरम्यान, हाळी येथून येणगेवाडीकडे दुचाकीवरून उज्ज्वलाबाई या एका नातेवाइकासाेबत जात हाेत्या. दरम्यान, हाळी हंडरगुळी गावानजीक मोरतळे यांच्या ढाब्यासमोरील वळण रस्त्यावर पाऊस पडल्याने अचानक दुचाकी घसरली. 

यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर पडली अन् समोरून येणाऱ्या बसखाली आली. यावेळी बसच्या चाकाखाली ही महिला चिरडली गेली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी संजय दळवी, कसबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत वाढवणा पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघात