पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:19+5:302021-08-18T04:26:19+5:30
स्टेशन मास्तर म्हणतात... लातूर रेल्वेस्थानकातून वेगवेगळ्या मार्गावर सध्याला सात एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. सध्याला दाेन पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. ...

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का
स्टेशन मास्तर म्हणतात...
लातूर रेल्वेस्थानकातून वेगवेगळ्या मार्गावर सध्याला सात एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. सध्याला दाेन पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. या एक्स्प्रेस रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. टप्प्या-टप्प्याने बंद असलेल्या रेल्वे सुरू हाेतील.
बिमलकुमार तिवारी, रेल्वे स्थानक प्रमुख, लातूर.
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे...लातूर येथील प्रवाशांच्या साेयीसाठी दाेन पॅसेंजर रेल्वेसेवा काेराेनापूर्वी सुरू करण्यात आल्या हाेत्या. यामध्ये निजामाबाद ते पंढरपूर आणि परळी वैजनाथ ते मीरज या रेल्वेसेवांचा समावेश हाेता. आता या दाेन्ही पॅसेंजर रेल्वे काेराेना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंदच आहेत. केवळ सात एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत.
सुुरू असलेल्या एक्स्प्रेस...
लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या एकूण सात रेल्वेगाड्यांमध्ये लातूर-मुंबई, बीदर-मुंबई, हैदराबाद-हडपसर, नागरपूर-काेल्हापूर, काेल्हापूर-धनबाद, नांदेड-पनवेल, यशवंतपूर ते लातूर यांचा समावेश आहे. या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे.
रेल्वेचा ‘स्पेशल’ प्रवास परवडत नाही...
लातूर रेल्वेस्थानकातून धावणाऱ्या सातही रेल्वेगाड्या या एक्स्प्रेस आहेत. परिणामी, या रेल्वेगाड्यांचा ‘स्पेशल’ प्रवास सामान्य प्रवाशांना परवडत नाही. तिकीटही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यातून पर्याय म्हणून अनेक सामान्य प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागताे. - निखिल जाधव, लातूर
काेराेनापूर्वी मी लातूर येथून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात हाेताे. दरम्यान, लातूर राेड येथूनही प्रवासी, भाविकांसाठी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे साेयीची हाेती. आता ती बंद करण्यात आल्याने, अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. स्पेशल रेल्वेचा प्रवास परवडत नाही. - गाेविंदराव वाढवणकर, उदगीर.
बंद असलेल्या रेल्वेगाड्या...
लातूर रेल्वे स्थानकातून दाेन पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असून, यामध्ये निजामाबाद ते पंढरपूर आणि परळी वैजनाथ ते मिरज या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तर सात एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुसाट धावत आहेत.