औसा शहर विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:23+5:302021-08-20T04:25:23+5:30
माकणी ते औसा ३७ किमी पाणीपुरवठा योजनेचे व शहरातील विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी डिजिटल प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत ...

औसा शहर विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य करू
माकणी ते औसा ३७ किमी पाणीपुरवठा योजनेचे व शहरातील विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी डिजिटल प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. अर्थमंत्री म्हणून औसेकर यांच्या विकासाला आपली खंबीर साथ राहील. मराठा भवन, तलाव संवर्धन, सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, शहरातील रस्ते आदी कामे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहेत. भविष्यात शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्यासाठी भूमिगत नाल्या, शहर स्वच्छता, वृक्ष लागवड व संवर्धन अशा योजनांचा प्रकल्प तयार करावा. नागरिकांनीही नागरी सुविधा मिळत असताना वेळेत कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. औसा शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण व्हावी. स्वच्छ सर्वेक्षण योजनेत औसा नगरपालिकेने चांगले काम केल्यामुळे पालिका पारितोषिकाची मानकरी ठरली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असेही अजित पवार म्हणाले. औसा नगरपालिकेत नगराध्यक्षांनी ऑनलाईनची व्यवस्था केल्यामुळे आणि शहरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था केल्याने शहरवासीयांना हा कार्यक्रम पाहता आला. नगरपालिका सभागृहात उपनगराध्यक्ष कीर्ती कांबळे, मुख्याधिकारी वसुधा फड, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, मेहाराज शेख, मुजाहिद शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नियोजन मंडळाचे सदस्य श्रीकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.