शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

पाणी बचतीसाठी काटकसर; २० एमएलडीने उपसा घटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 19:27 IST

७० एमएलडीची गरज असताना ५० एमएलडी उचलले जात आहे पाणी

लातूर : शहरासाठी दैनंदिन पाण्याची गरज ७० एमएलडी आहे. परंतु, जून अखेर पाणी पुरावे म्हणून लातूर मनपाने मांजरा प्रकल्पातून दररोज ५० एमएलडी पाणी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. २० एमएलडी पाणी कमी उचलले जात आहे. जेणेकरून पाण्याची बचत होऊन आगामी पावसाळ्यापर्यंत ते पुरविण्याचा प्रयत्न आहे. 

लातूर शहराला पाणी पुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात ३३ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. २०१८ च्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाण्याचा एक थेंबही संचय झाला नाही. २०१७ मधील पावसाळ्यातील पाण्यावर लातूर शहराची तहान भागविली जात आहे. त्यामधीलच ३३ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या मांजरा प्रकल्पात आहे. या प्रकल्पातून लातूर शहरासाठी यापूर्वी दररोज ७० एमएलडी पाणी उचलले जायचे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून ५० एमएलडी पाणी उचलले जात आहे. जून अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनानेही काटकसर सुरू केली आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा. नळाला पाणी आल्यानंतर वाया घालवू नये.

बाथरुममध्ये सोडणे, वाहने धुणे, रस्त्यावर सडा मारून पाण्याची नासाडी करणे आदी प्रकार नागरिकांनी थांबवून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काटकसरीने या पाण्याचा वापर केल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरू शकते. त्यासाठी सर्व लातूरकरांनी पाणी बचतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. 

१० हजार १६ पॉवर पंप कार्यान्वित... लातूर मनपाचे शहरात १० हजार १६ पॉवर पंप आहेत. बहुतांश पॉवर पंप रिचार्ज केलेले आहेत. यातील दहा-पाच पॉवर पंपाचा अपवाद वगळता सर्व पंप सुरू आहेत. पाणीही चांगले आहे. त्यासाठी स्टँड पोस्ट लावण्यात आले आहेत. या पॉवर पंपाद्वारे संबंधित नगरातील नागरिकांना पाणी मिळते, असेही पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. 

पाणी पुरवठ्याचे पूर्वीचेच वेळापत्रक... काटकसरीचा उपाय म्हणून दहा दिवसांआड पाणी देण्याचा मनपा प्रशासनाचा विचार होता. परंतु, स्थायी समितीच्या सभागृहात या विषयाला मंजुरी न मिळाल्यामुळे पाणी पुरवठा वितरणाचे पूर्वीचेच वेळापत्रक असून, सध्या आठ दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई