मांजरा धरणातून कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:01+5:302021-03-24T04:18:01+5:30

यावर्षी पावसाळ्यात सुरूवातील अत्यल्प पाऊस्‍ा तर परतीचा पाऊस चांगला झाला. पावसाच्या अनियमीततेमुळे पाणी पातळी मात्र वाढली नाही. उन्हाळ्याची तीव्रता ...

Water for agriculture through canal from Manjara dam | मांजरा धरणातून कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी

मांजरा धरणातून कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी

यावर्षी पावसाळ्यात सुरूवातील अत्यल्प पाऊस्‍ा तर परतीचा पाऊस चांगला झाला. पावसाच्या अनियमीततेमुळे पाणी पातळी मात्र वाढली नाही. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने परिणामी सध्या नदी, तलाव, विहीरी तसेच ट्युबवेलची पाणी पातळी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. मांजरा धरणातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत होती. याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आ. धीरज देशमुख यांची भेट घेऊन मांजरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. आ. धीरज देशमुख यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क करुन मांजरा धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समिती बैठकीत निर्देश दिल्याप्रमाणे मांजरा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यावदारे २२ मार्चपासून पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारी ३० ते ३५ किमी पर्यंत पाणी पोहचले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Water for agriculture through canal from Manjara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.