चापाेली आराेग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठाेकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:05+5:302020-12-31T04:20:05+5:30
चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाेन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मात्र, त्यातील एक वैद्यकीय अधिकारी हे गत दाेन महिन्यापासून ...

चापाेली आराेग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठाेकले टाळे
चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाेन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मात्र, त्यातील एक वैद्यकीय अधिकारी हे गत दाेन महिन्यापासून रजेवर आहेत. तर मंगळवारी चापोली आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. ही बाब चापोली येथील जिल्हा परिषद सदस्स डॉ. पुंडलिक चाटे, रामेश्वर कंटे, लक्ष्मण पाटील, राजू गुडपल्ले, बद्रीनाथ स्वामी, चाँद शैख, दावल शैख, बाबा सय्यद यांना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. दरम्यान, सदर घटनेबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांना दूरध्वनीद्वारे माहीती कळविण्यात आली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाइ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदाेलन मागे घेत, प्रवेशद्वाराचे टाळे काढले. यावेळी चाकूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी चापोली आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने बाह्यरुग्ण आणि आंतरुग्णांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड झाली.