Vikrant Gojamgunde of Congress elected as mayor of Latur, two BJP corporators rebels | सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर
सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर

ठळक मुद्देमनपात बहुमत असलेल्या  भाजपा महापौर पदाचा उमेदवार पराभूत

लातूर : लातूरच्या महापौरपदी काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा 35 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर विजय मिळविला. भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँगेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. महापौर निवडणुकीत काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा 35 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला.  भाजपच्या दोन व अन्य एक  नगरसेवकाने काँगेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.तर उपमहापौर पदाची निवडणूक भाजपच्या भाग्यश्री कौळखरे व भाजपचेच बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांच्यात झाली. यात भाजपचे बंडखोर चंद्रकांत  बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर 32 विरुद्ध 35 मतांनी विजय संपादन केला.
अडीच वर्षातच महापालिकेत सत्तांतर झाले.

मनपात काँग्रेस 33, भाजप 35 व अन्य 1 असे पक्षीय बलाबल आहे. बैठकीस काँगेसचा एक सदस्य अनुपस्थित असून भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे  महापौर पदाच्या निवडणुकीसाठी 68 सदस्य उपस्थित होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात 68 पैकी 35 मते काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली आहेत. तर उपमहापौर निवड बैठकीत 68 पैकी भाजपच्या  नागरसेविका शकुंतला गाडेकर अनुपस्थित राहिल्या. दरम्यान भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला होता.  व्हीप डावलून काँगेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. निवडीनंतर काँगेस कार्यर्त्यांनी मनपा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

Web Title: Vikrant Gojamgunde of Congress elected as mayor of Latur, two BJP corporators rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.