उदगीरात वट सावित्री सण उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:30+5:302021-06-25T04:15:30+5:30
उदगीर : येथील शहर व परिसरात वट सावित्रीचा सण पारंपरिकरित्या गुरुवारी उत्साहात पार पडला. पौराणिक कथेसह वैज्ञानिक दृष्टिकोनातून वडाचे ...

उदगीरात वट सावित्री सण उत्साहात साजरा
उदगीर : येथील शहर व परिसरात वट सावित्रीचा सण पारंपरिकरित्या गुरुवारी उत्साहात पार पडला. पौराणिक कथेसह वैज्ञानिक दृष्टिकोनातून वडाचे झाड हे अत्यंत उपयुक्त आहे.
ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचे पूजन करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत आचरतात. सकाळी स्त्रिया घरातील कामे आटपून आपल्या पतीला आरोग्यसंपन्न व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करताना हळदी-कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या व आंबे हे सौभाग्य अलंकार अर्पण करून तिहेरी सुती दोर यासह वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असते. या परंपरेनुसार शहरातील महिला सकाळपासूनच शहरात जेथे-जेथे वडाचे झाड आहे, त्याठिकाणी विधीवत पूजा करून एकमेकींच्या ओटी भरत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच सण आल्याने व शासनाने नियम शिथील केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वडाच्या झाडाची पूजा करताना दिसून आल्या.
===Photopath===
240621\img_20210624_135757.jpg
===Caption===
उदगीरात वट सावित्री सण साजरा