आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:24+5:302020-12-14T04:33:24+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे कार्य
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद हेंगणे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, निवृत्ती कांबळे, शहराध्यक्ष अजहर बागवान, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दत्तात्रय बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनील दासरे यांची उपस्थिती होती.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, १० वैद्यकीय अधिकारी, १० आशा गट प्रवर्तक, १६७ आशा कार्यकर्ती अशा एकूण २०६ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी आरोग्य अधिकारी डाॅ. सुरजमल सिंहाते, डाॅ. जयप्रकाश केंद्रे, डाॅ. अमृत चिवडे, डाॅ. धीरज देशमुख, डॉ. बाळासाहेब बयास, डाॅ. के.व्ही. चौकोते, डाॅ.एस.एस. थोरात, डाॅ. मधुसूदन चेरेकर, प्रवीण भोसले, डाॅ. व्ही.जी. फड, दिलीप जाधव, बालासाहेब पाटील, प्रशांत भोसले, नगरसेवक सय्यदलाल सय्यद सरवर, अनुराधा नळेगावकर, ताजोद्दीन सय्यद, चंद्रशेखर भालेराव, दयानंद पाटील, फेरोज शेख, सतीश नवटक्के, दिलदार शेख, मुख्याध्यापिका आशा रोडगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी केले.