जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:51 IST2026-03-07T19:50:38+5:302026-03-07T19:51:07+5:30

यूपीएससीत निलंग्याचा सूरज सूर्यवंशी पुन्हा यशस्वी; क्रीडा मंत्रालयातून आता आयएएस पदाकडे वाटचाल

UPSC Result 2025: Nilanga's Suraj Suryavanshi Clears UPSC for the Second Time; Secures 702nd Rank to Fulfill IAS Dream | जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला

जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला

निलंगा : सुरुवातीला दोनदा अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीत यश मिळवित भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयात सहाय्यक संचालक पदाला गवसणी घातली. मात्र, मनातील आयएएस व्हायचेयं ही जिद्द शांत बसू देत नव्हती. भोपाळला ट्रेनिंग घेत अभ्यास आणि अनुभवाच्या बळावर सूरजने दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली आहे.

निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील माणिक सूर्यवंशी हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सध्या भादा येथे कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले असून थोरला सुरज. सुरज यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील ग्रामसेवक असल्याने वारंवार बदली होत असल्यामुळे त्यानंतरचे दहावीपर्यंत शिक्षण उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण केले. तद्नंतर पुणे येथे सामाजिक शास्त्रात नेट- सेट उत्तीर्ण झाले. एक वर्ष तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केले. मात्र, आपण आएएस व्हायचे अशी बालपणापासून मनीषा असल्याने दिल्ली गाठली आणि तिथे अभ्यास सुरु केला. सुरुवातीच्या दोन परीक्षांत अपयश आले. त्यामुळे ते डगमले नाहीत. कठोर परिश्रम सुरुच ठेवले आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्यामुळे भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावर निवड झाली. त्यानुसार सध्या ते भोपाळ येथे ट्रेनिंग घेत आहेत.
दरम्यान, आपण आयएएस व्हायचे म्हणून अनुभवाच्या जोरावर परीक्षेची तयारी केली आणि देशात ७०२ वा रँक मिळवित पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली.

जिद्दीला यशाचे फळ
वेळेचे नियोजन करुन अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार अभ्यास करीत असे. जिद्दीला यशाचे फळ मिळाले आहे. ग्रामीण युवकांनी कष्ट आणि नियोजन ठेवल्यास निश्चित यश मिळते.
- सूरज सूर्यवंशी.

जीवनाचे सार्थक झाले
सूरज दररोज १४ तास अभ्यास करीत असे. गतवर्षी तो युपीएससी उत्तीर्ण झाल्याने मुलगा क्लास वन झाला. याचा आनंद होता. मात्र, आणखीन चांगल्या पदावर पोहोचण्यासाठी पुन्हा तयारी करुन यश मिळविले. त्याचा खूप आनंद झाला आणि आमच्या जीवनाचे सार्थक झाले.
- माणिक सूर्यवंशी, वडील.

Web Title : लगन से नीलमगा के सूरज ने फिर यूपीएससी में मारी बाज़ी, 702वां रैंक

Web Summary : नीलंगा के सूरज सूर्यवंशी ने शुरुआती असफलताओं के बाद फिर यूपीएससी पास की। खेल मंत्रालय में सहायक निदेशक के रूप में भोपाल में प्रशिक्षण ले रहे हैं, उन्होंने कड़ी मेहनत और अनुभव से 702वां रैंक हासिल कर आईएएस बनने का सपना पूरा किया।

Web Title : Nilanga's Suraj triumphs again in UPSC with perseverance, secures 702nd rank.

Web Summary : Suraj Suryavanshi from Nilanga, after initial failures, cracked UPSC again. Currently training in Bhopal after becoming Assistant Director, Ministry of Sports, he secured 702nd rank, fulfilling his IAS dream through hard work and experience.