शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:15 IST

यूपीएससी गुणवत्ता यादीत डॉ. प्रीतमकुमार भाले यांचे नाव; ७४२ गुणांसह पटकावले यश; जळकोट तालुक्यात जल्लोष!

जळकोट : मोठ्या कष्टाने दिवसरात्रं अभ्यास केला. परंतु, पहिली संधी ५ गुणांनी हुकली. दुसऱ्या प्रयत्नात नशिबाने साथ न दिल्याने अवघा एक गुण कमी पडला आणि अपयश आले. मात्र, जिद्द आणि आत्मविश्वास तसूभरही ढळू न देता डॉ. प्रीतमकुमार भाले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे.

जळकोट तालुक्यातील येवरी येथील बाबुराव भाले हे निलंगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत होते. त्यांना तीन मुले असून प्रियंका ही भूलतज्ज्ञ आहे. दुसरी मुलगी नेत्ररोग तज्ज्ञ आहे तर मुलगा प्रीतम हा डाॅक्टर आहे. डॉ. प्रीतमकुमार यांचे प्राथमिक शिक्षण लातुरातील वाले इंग्लिश स्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील केईएममधून एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. डॉक्टर होऊनही समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि यूपीएससीचा अभ्यास सुरु केला.

पहिला प्रयत्नाची संधी केवळ ५ गुणांनी हुकली. त्यामुळे पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरु केला. मात्र, दुसरा प्रयत्नात नशिबाने साथ दिली नाही आणि केवळ एक गुणामुळे अपयश आले. अपयशामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरु केला. तिसऱ्या प्रयत्नात ७४२ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.

डोळ्यासमोर महापुरुषांचा आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. वडील किशनराव भाले यांच्याकडून आम्हाला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. मुलांनीही यश मिळवून सार्थक केले आहे.- बाबुराव भाले, वडील.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव...डॉ. प्रीतमकुमार भाले यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक माजी मंत्री आ. संजय बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्यासह सरपंच सोमनाथ वाकळे, संतोष काकडे, राजकुमार भाले, विद्यासागर भाले, मनोहर वाकळे, मारुती तिर्थे, बळीराम तिर्थे आदींनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Doctor Preetamkumar Bhaley Cracks UPSC After Two Missed Chances.

Web Summary : Despite two near misses, Dr. Preetamkumar Bhaley of Latur persevered and cracked the UPSC exam. Overcoming initial setbacks, the doctor's determination and hard work led to success in his third attempt, fulfilling his dream of serving society.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगlaturलातूरEducationशिक्षण