Latur Accident: उदगीर-नळेगाव मार्गावरील करडखेल पाटीनजीक शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले असून, धडक दिल्यानंतर कारचालक आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
पाेलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गौतम ज्ञानोबा कांबळे (वय २५) आणि सुनील नागू कांबळे (वय १९, दोघेही रा. लोहारा ता. उदगीर) हे आपल्या दुचाकीने (एम.एच. २४ ए.ई. ८९९८) गावाकडे जात होते. त्याचवेळी लातूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एम.एच. २४ बी.एल. ०८६७) त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आणि कारच्या समोरील भागाचाही चक्काचूर झाला.
अपघातानंतर लातूर-उदगीर मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी नामदेव चेवले यांनी सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात पाठवले असून, रात्री उशिरा रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघातानंतर कारचालक फरार...धडक बसल्यानंतर कारमधील चालक व प्रवासी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. कारमध्ये नेमके किती जण होते? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. सध्या पोलिस फरार कारचालकाचा शोध घेत असून, याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
Web Summary : A speeding car collided with a motorcycle near Udgir, killing two young men from Lohara instantly. The car driver fled the scene with his companions. Police are investigating the fatal accident.
Web Summary : उदगीर के पास तेज रफ्तार कार ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे लोहारा के दो युवकों की मौके पर ही मौत हो गई। कार चालक अपने साथियों के साथ मौके से फरार हो गया। पुलिस मामले की जांच कर रही है।