शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर ४ हजार ३२५ रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

उदगीर : केंद्र सरकारने आयात खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात आयात शुल्कात १० टक्के कपात केली होती. ...

उदगीर : केंद्र सरकारने आयात खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात आयात शुल्कात १० टक्के कपात केली होती. त्यामुळे गत महिन्यात सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. परंतु, तेलाला मागणी चांगली असल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. शनिवारी ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, खाद्यतेलाचे दरही वाढल्याने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत.

केंद्र शासनाने यंदा सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या हमीभावाच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात आली. सोयाबीनवर प्रक्रिया करणा-या उद्योजकांकडून वाढती मागणी असल्याने सोयाबीनचे दर गेल्या महिन्यात ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आता टप्प्या- टप्प्याने त्यात आणखीन वाढत होऊन ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले.

शासनाने वाढत्या खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने खाद्य तेलावरील आयात शुल्क दहा टक्के कपात केली. परंतु खाद्य तेलाला चांगली मागणी असल्याने सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शनिवारी उदगीरच्या मार्केट यार्डात सोयाबीनला आतापर्यंतचा सर्वोच्च ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

दोन- अडीच महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. सुरुवातीला परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाल्याने डागी मालाची आवक झाली होती. परंतु, मागील महिन्यापासून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात होऊनही सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक व बाहेरील कारखानदारांकडून चांगली मागणी होती. त्यातच सोयाबीनच्या तेलालाही उठाव असल्याने कारखानदार व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. बाजारात खाद्यतेलाच्या किंमती वाढत असल्याने सामान्य ग्राहकांत नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे शासनाने आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीवरील शुल्कात १० टक्के कपात केल्याने खाद्य तेलाच्या किमती काही दिवस कमी झाल्या होत्या. परंतु, मागणी वाढत असल्याने सोयाबीनचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. मागील महिन्यात चार हजारापर्यंत खाली आलेले दर टप्या-टप्प्याने वाढून शनिवारी उदगीर बाजार समितीत सर्वाधिक ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल दराने सोयबीनची विक्री झाली. सर्वसाधारण भाव ४ हजार २९० प्रति क्विंटल असा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिकुल घडणाऱ्या घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कमी झाली आहे. वाढत्या खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ३७ टक्के असलेले आयात शुल्क २७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. परंतु, मागणी चांगली असल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. सध्या कोणतेही खाद्य तेल १४० रुपये प्रति किलोच्या खाली उपलब्ध नाही. त्यामुळे आता सोयाबीन विक्रीची ही योग्य वेळ आहे. कारण सोया पेंडीला मागणी नाही. केवळ तेलाच्या आधारावर दर ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर घसल्यास सोयाबीनला फटका बसू शकतो.

- बालाजी बच्चेवार, व्यापारी.