अंगावर वीज पडून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:46 IST2020-06-25T20:45:07+5:302020-06-25T20:46:50+5:30

शिरूर अनंतपाळची घटना

Two youths were died due to lighting | अंगावर वीज पडून दोन युवकांचा मृत्यू

अंगावर वीज पडून दोन युवकांचा मृत्यू

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह पाऊस

शिरूर अनंतपाळ/ येरोळ  (जि़ लातूर):  शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद दक्षिण येथे अंगावर वीज पडल्याने दोन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली़ दरम्यान, तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ 

तालुक्यातील शेंद दक्षिण येथे अभिजीत राजकुमार मोरे आणि गौतम  दिगंबर कांबळे हे दोघे शेतात काम करीत होते़ गुरूवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला़ त्यामुळे दोघेही आंब्याच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते. त्यावेळी अचानक वीजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज कोसळल्याने  दोंघाचाही जागीच मृत्यु झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे़  दरम्यान, मंडळ अधिकारी डोंगरे, तलाठी सदानंद सोमवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे यांनी सांगितले़

Web Title: Two youths were died due to lighting