लातूरमधून दोघा जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:12+5:302021-06-16T04:27:12+5:30

लातूर : एका गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा जणांना ''एनआयए''च्या पथकाने लातुरातून दोन दिवसापूर्वी उचलले आहे. या दोघांना कोणत्या प्रकरणात ...

Two from Latur | लातूरमधून दोघा जणांना

लातूरमधून दोघा जणांना

लातूर : एका गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा जणांना ''एनआयए''च्या पथकाने लातुरातून दोन दिवसापूर्वी उचलले आहे. या दोघांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली, हे मात्र अद्याप समोर आले नाही. याप्रकरणाने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे एक गंभीर गुन्हा घडल्यानंतर फरार झालेल्या दोघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेची नजर होती. सदर गुन्ह्यातील संतोष शेलार आणि आनंद जाधव हे दोघेही गत काही दिवसांपासून लातूर शहरात दडी मारून बसल्याची माहिती पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे ''एनआयए''च्या पथकाने या दोघांना अटक केली आहे. मात्र, याबाबत ''एनआयए''च्या सूत्रांनी कुठलीही स्पष्टता दिली नाही. याप्रकरणाने लातुरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

दोघांना अटक मात्र कारण अस्पष्ट...

याबाबत लातूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, लातूर शहरात एका गुन्ह्यात फरार असलेल्या, दडी मारून बसलेल्या दोघांना ''एनआयए''च्या पथकाने दोन दिवसापूर्वी अटक केली आहे. एवढीच आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे. परिणामी, या अटकेबाबत कुठलीही स्पष्टता समोर आली नाही.

Web Title: Two from Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.