कार- दुचाकी अपघातात दोघे ठार, दोनजण जखमी

By हरी मोकाशे | Updated: July 24, 2023 19:13 IST2023-07-24T19:13:44+5:302023-07-24T19:13:53+5:30

याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two killed, two injured in car-two-wheeler accident | कार- दुचाकी अपघातात दोघे ठार, दोनजण जखमी

कार- दुचाकी अपघातात दोघे ठार, दोनजण जखमी

वलांडी (जि. लातूर) : देवणी तालुक्यातील विळेगाव शिवारात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात वलांडीतील दोघांचा मृत्यू झाला तर दोन बालके गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानोबा गंगाराम डुबे (४०, रा. वलांडी), जावेद चाँदपाशा शेख (५, रा. वलांडी, ता. देवणी) अशी मयत दोघांची नावे आहेत. देवणी पोलिसांनी सांगितले, वलांडी येथील ज्ञानोबा गंगाराम डुबे व त्यांची पंढरी आणि विष्णू ही दोन मुले असे एकूण तिघेजण रविवारी दुचाकी (युजीजी ६०६२) वरुन वलांडीहून विळेगावकडे जात होते. तेव्हा देवणीहून भरधाव येणाऱ्या कार (एमएच १२, जेयू ४००५) ने जोराची धडक दिली. त्यात दुचाकीस्वार ज्ञानोबा डुबे हे जागीच ठार झाले. त्याची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी उदगीरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ दत्तात्रय डुबे यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोउपनि. नारायण डप्पडवाड करीत आहेत.

कारमधील बालकाचाही मृत्यू...
या अपघातात कारमधील बालक जावेद चाँदपाशा शेख (५) हा अपघात घडल्यानंतर कारमधून बाहेर फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे जाहीर केले. या घटनेेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Two killed, two injured in car-two-wheeler accident