दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण गंभीर जखमी

By हरी मोकाशे | Updated: December 10, 2022 18:36 IST2022-12-10T18:35:16+5:302022-12-10T18:36:52+5:30

जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहेत.

Two bikes collide head-on; Three people were seriously injured | दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण गंभीर जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण गंभीर जखमी

लातूर : जळकोट- उदगीर महामार्गावरील पाटोदा बु. येथील पुलावरील वळणावर मोटारसायकल आणि स्कुटीची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली.

जळकोट तालुक्यातील कोळनूर येथून स्कुटी (केए ३२ ई ४३२५) वरुन एकजण जात होता. तेव्हा पाटोदा बु. येथील पुलावरील वळणावर स्कुटी आणि दुचाकी (एमएच २६ एडब्ल्यू १८८१) ची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात तिघेजण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा पठाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

रुग्णवाहिकेस बोलावून घेऊन गंभीर जखमी तिघांनाही उपचारासाठी उदगीरला पाठविले. तिघांपैकी एकाचा पाय मोडल्याचे तर अन्य दोघांच्या डोक्यास, हाता- पायास जबर मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकली नाहीत. जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहे. या वळण ठिकाणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांतून होत आहे.

Web Title: Two bikes collide head-on; Three people were seriously injured