औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2023 05:25 IST2023-10-17T05:25:34+5:302023-10-17T05:25:50+5:30

कारचा झाला चेंदामेंदा : साेमवारी रात्री उशिराची घटना...

Truck-car accident on Ausa-Tuljapur highway; one injured | औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी

औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी

औसा (जि. लातूर) : औसा येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक आणि कारचा आझाद महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर अपघात झाला असून, कारचा समाेरील भाग चेंदामेंदा झाला. यामध्ये कारचालकाच्या उजव्या हाताला, डाेक्याला मार लागला आहे. औसा-तुळजापूर महामार्गावरून अनेक भाविक तुळजापूरला पायी दर्शनाला जात असून, सुदैवाने अनर्थ टळला आहे.

औसा येथील तुळजापूर महामार्गावरील आझाद महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलावरून ट्रक (एम.एच. २६ बी.ई. २३३१) तुळजापूरकडे जात होता, तर कार (एम.एच. ४६ ए.यू. ९४३२) जाताना रात्री उशिरा दोन्ही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये कारचालक रोहन झुंबर सोलांने (वय २२) हा जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. दरम्यान, औसा पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत वाहतूक सुरळीत केली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

भाविकांसाठी पाेलिस बंदोबस्त...
नवरात्र महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी भाविक तुळजापूरला पायी जातात. वाहनधारकांसह इतरांकडून त्रास हाेणार नाही, यासाठी बुधोडा, औसा, तुळजापूर मोड, शिवली मोडपर्यंत पाेलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अधिकाऱ्यासह २० पोलिस कर्मचारी गस्तीवर आहेत, असे पोनि. सुनील रेजितवाड म्हणाले.

Web Title: Truck-car accident on Ausa-Tuljapur highway; one injured

टॅग्स :Accidentअपघात