शिवसेनेतर्फे चाकुरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:55+5:302021-06-16T04:27:55+5:30
शिवसेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे उपक्रम पार पडले. आष्टा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात २५० रोपांची लागवड सोसायटीचे ...

शिवसेनेतर्फे चाकुरात वृक्षारोपण
शिवसेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे उपक्रम पार पडले. आष्टा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात २५० रोपांची लागवड सोसायटीचे चेअरमन रमाकांत पाटील यांच्या हस्ते झाली. देवंग्रा येथील जिल्हा परिषद शाळेत दिलीप पारवे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. तिवटघाळ येथे दिलीप पाटील, चाकूर येथे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, चापोलीच्या ३३ केव्ही उपकेंद्रात उपतालुकाप्रमुख गजानन होनराव, आनंदवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत युवा सेनेचे पाडुरंग बुदराळे यांच्या हस्ते वृक्षरोपण झाले.
कोविड काळात उत्कृष्ट कार्य केल्याने आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. चाकूरच्या कोविड सेंटरमध्ये डॉ. स्नेहा हाके, कर्मचारी मोहिनी पाटील, सुप्रिया किनगावकर, खालित शेख, पाडुरंग माने, होमगार्ड विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, किरण गायकवाड, पांडुरंग बुदराळे, दिलीप पाटील, गजानन होनराव, दत्ता नरवाडे, धोंडिराम मुंठे, विशाल सावंत, ज्ञानोबा शिंदे, गोविंद नरवाडे, विष्णू तांदळे, सत्तार शेख, शंकर पाटील, किसन निकम, सिध्देश्वर नवटक्के, केदार निकम, रत्नदीप शिंदे, शाहरूख शेख, शंकर निटुरे आदी उपस्थित होते.