कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सूरज पाटील होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश कळसाईतकर होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, विलास चामे, पर्यवेक्षक लालासाहेब बोकडे, प्रा. अनिल सुरवसे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, जितेंद्र बदने, सुशीलकुमार पाटील, प्रमोद शिरुरकर, वैजनाथ मुंडे, डाॅ. गजानन दमकोंडवार, प्रा. गोविंद भगत, सत्तार शेख, विश्वजित घोगरे, मनोहर माळी, प्रा. गणपत जाधव, व्यंकट वंगे, शादुल शेख, चंद्रशेखर भालेराव, शिवाजीराव सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, विकास राठोड, गंगाधर भांगे, प्रा. अनिल चवळे, मारोती बुद्रुक यांची उपस्थिती होती.
सिनेअभिनेता शिंदे म्हणाले, वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल व प्राणवायूचे प्रमाण वाढेल आणि मानवी जीवन अधिक सुखकर बनेल. प्रत्येकाने आपल्या जन्मदिनी वृक्षारोपण करून वृक्षांची जोपासना करावी, असे आवाहन केले.
फोटो ओळी : किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात वृक्ष लागवड करताना सिने अभिनेता सयाजी शिंदे, सूरज पाटील, प्रकाश कळसाईतकर.