कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह हस्तांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:09+5:302021-04-12T04:18:09+5:30

जळकोट तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी ...

Transfer to hostel for Covid Care Center | कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह हस्तांतरित करा

कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह हस्तांतरित करा

Next

जळकोट तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी लोखंडे म्हणाले, तहसीलदार, फौजदार, डॉक्टर्स, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी या पाच जणांची दररोज बैठक घेऊन शहर व तालुक्यात कोरोनासंदर्भात जनजागृती करावी. सर्वांनी समन्वय ठेवावे. गृहविलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरतात का, यावर विशेष पथकाने लक्ष ठेवावे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांवर उपचार व त्यांच्या भोजनाची काळजी घ्यावी. पाेलीस प्रशासनाने दंड स्वरुपात जमा केलेले ४० हजार रुपये रुग्णसेवेसाठी वापरावेत.

यावेळी प्रवीण मेंगशेट्टी यांनी एकुरका, शिंदगी, वांजरवाडा, जळकोट शहरात विशेष आरोग्य पथकांची स्थापना करावी. जळकोटातील पाणीटंचाई निवारणार्थ तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगरपंचायतीस केल्या. यावेळी कृउबाचे माजी सभापती मन्मथ किडे यांनी जळकोटात कोविड हॉस्पिटल सुरु करावे, कृत्रिम पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी केली.

बाधितांच्या जाणून घेतल्या अडचणी...

अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आपले मनोधैर्य खचू देऊ नका. आरोग्य व महसूल प्रशासन आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तसेच वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, खादरभाई लाटवाले, आयुब शेख, शिवशंकर काळे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, डॉ. संजय पवार, डॉ. जगदीश सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, कार्यकारी उपअभियंता तेजस वसूरकर, शाखा अभियंता प्रमोद कुलकर्णी, सुनील काळे, मुख्याधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Transfer to hostel for Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.