सोलापूरच्या धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:30+5:302021-09-21T04:22:30+5:30

साेलापूर : येथील धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम असून, १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या महोत्सवाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद आहे. पुण्या-मुंबईच्या ...

The tradition of Dhoot Saree Festival of Solapur continues | सोलापूरच्या धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम

सोलापूरच्या धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम

साेलापूर : येथील धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम असून, १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या महोत्सवाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद आहे. पुण्या-मुंबईच्या ग्राहकांनाही भुरळ घालणारा हा महोत्सव आहे. याठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस असून, महोत्सवाची ६० वर्षांची परंपरा आहे.

ग्राहकांसाठी आव्हानात्मक कमी दरात बक्षिसांसह खरेदी करण्याची ही पर्वणी आहे. राखी पौर्णिमेपासून ते दिवाळी पर्यंतचे सणवार, लग्न सराई आणि महोत्सव यांचा संयोग साधला जातो. सोलापूरची खासियत असलेल्या सिल्कच्या साड्यांचे एक्स्क्लूजिव शोरूम

केवळ सिल्कच्या साड्या आणि कपड्यांचे तसेच खास वेडिंग कलेक्शनचे स्वतंत्र दुकान आणि शोरूम फक्त सोलापूर शहरातच नाही तर लगतचे कर्नाटकातले जिल्हे आणि मराठवाड्यात एकमेव आहे. कमीत कमी किमतीतल्या सिल्कच्या साडीपासून ते लाख रुपये किमतीच्या मौल्यवान साडीपर्यंत अनेक व्हेरायटीजच्या साड्या उपलब्ध आहेत. लग्नाच्या साड्या, घागरा, ओढणी, वर्कच्या मनमोहक काम केलेल्या साड्या, पेहराव, चोली, शेकडो प्रकारचे ड्रेस मटेरियल, राजस्थानी, कर्नाटक, बंगळूर, मैसूर, डिंडिगल, धर्मावरम, मदुराई, बनारस, कोलकाता, अशा अनेक ठिकाणच्या कलाकार विणकरांनी विणलेल्या सिल्क साड्या थेट मागावरून दुकानात आहे. सोलापूर शहरातील चाटे गल्ली, बाळीवेस भागातील धूत सारिजमध्ये हा महोत्सव सुरू आहे. (वाणिज्य वार्ता)

Web Title: The tradition of Dhoot Saree Festival of Solapur continues