लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, मुख्य आरोपीस अटक

By हरी मोकाशे | Updated: November 9, 2022 19:46 IST2022-11-09T19:46:40+5:302022-11-09T19:46:51+5:30

पीडित महिलेस आरोपीपासून दूर करण्यासाठी आरोपीच्या नातलगांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

Torture by luring marriage, main accused arrested | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, मुख्य आरोपीस अटक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, मुख्य आरोपीस अटक

उदगीर : शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ३२ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षांपासून अत्याचार केला. दरम्यान, मुख्य आरोपीच्या नातलगांनी पीडित महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिल्याने मुख्य आरोपीसह अन्य चौघांविरुध्द ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, निलंग्यातील मूळ रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पीडित महिलेस (ह.मु. उदगीर) येथील आरोपी जहाँगीर इब्राहिम खुरेशी याने तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखविले. त्याने २०१५ ते २४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अत्याचार केले. दरम्यान, पीडित महिलेस आरोपीपासून दूर करण्यासाठी आरोपीच्या नातलगांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह त्याच्या अन्य चार नातेवाइकांविरुध्द विविध कलमान्वये व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे.

Web Title: Torture by luring marriage, main accused arrested