कंटनेरमधून पशुधनाची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अटक !
By राजकुमार जोंधळे | Updated: August 5, 2023 17:29 IST2023-08-05T17:29:37+5:302023-08-05T17:29:48+5:30
याप्रकरणी अहमदपुरात गुन्हा दाखल; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कंटनेरमधून पशुधनाची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अटक !
अहमदपूर (जि. लातूर ) : कंटनेरमधून कत्तलीसाठी चोरट्यामार्गाने वाहतूक करणाऱ्या तिघांना अहमदपूर पोलिसांनी आज सकाळी अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहनासह पशुधन असा २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर येथे एका कंटेनरमधून (एमएच ५५ के १३४२) काळेगावरोडच्या दिशेने बैलांची चोरट्या मार्गाने वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमदपूर शहरातील चवंडा पाटीनजीक सापळा लावला. त्यावेळी कंटेनर समोरुन येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालकाला कंटेनर थांबविण्यास सांगून कंटेनरची झाडाझडती घेतली असता, त्यात २५ बैल कोंबल्याचे आढळून आले. पोलिसांनी कंटेनर जप्त करुन त्यातील पशुधनाची सुटका करण्यात आली.
याबाबत विक्रम पास शेख ,(वय ४५, रा. चामराजनगर, जि. म्हैसूर), शफीक इमाम सय्यद (वय ४५, रा. उदयगिरी, जि. म्हैसूर), महम्मद शराब पठाण (वय ५०, रा. उदयगिरी,जि. म्हैसूर) यांना अटक केली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पशुधन आणि कंटनेर असा एकूण २७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोटेवाड करीत आहेत.