इंदापूर जवळील अपघातात लातूरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:11 IST2021-02-08T12:09:54+5:302021-02-08T12:11:49+5:30

Accident News पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं-२ हद्दीत कारचा आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात

Three members of the same family from Latur were killed in an accident near Indapur | इंदापूर जवळील अपघातात लातूरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

इंदापूर जवळील अपघातात लातूरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

ठळक मुद्देलातूर येथील कुटुंब रविवारी सकाळी खाजगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. तेथील काम आटोपून रात्री ते लातूरकडे निघाले होते. 

लातूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं- २ च्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातातलातूरातील एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

गीता अरुण माने, अरुण बाबुराव माने व मुलगा मुकुंद अरुण माने (रा. लक्ष्मी कॉलनी, शिवाजी शाळेसमोर, खाडगाव रोड, लातुर) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. लातूरातील गीता माने, अरुण माने, मुकुंद माने, साक्षी माने व कारचालक हे पाच जण रविवारी सकाळी खाजगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. तेथील काम आटोपून रात्री ते लातूरकडे निघाले होते. 

दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं-२ हद्दीत त्यांच्या कारचा आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात गीता माने, अरुण माने, मुकुंद माने हे तिघे ठार झाले आहेत. मुलगी साक्षी माने आणि कारचालक हे जखमी झाले आहेत. अरुण माने हे लातूरातील टायर व्यावसायिक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: Three members of the same family from Latur were killed in an accident near Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.