शिक्षिकेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसकाविले, लातूरची घटना

By आशपाक पठाण | Updated: December 8, 2022 20:42 IST2022-12-08T20:42:13+5:302022-12-08T20:42:25+5:30

शाळेचे काम संपल्यावर निघाल्या होत्या घरी.

Three-and-a-half tola chain snatched from teacher's neck, Latur incident | शिक्षिकेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसकाविले, लातूरची घटना

शिक्षिकेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसकाविले, लातूरची घटना

लातूर: शाळेचे काम आटोपून घरी जात असताना शाम नगर येथील केशवराज विद्यालयातील एका सहशिक्षिकेच्या गळ्यातील जवळपास साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघांनी पळविल्याची घटना ५ डिसेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले,  केशवराज विद्यालयातील सहशिक्षिका शैलजा कुलदीप देशमुख (वय ४२) या ५ डिसेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेतून विशाल नगरातील गगन विहार येथील घराकडे पायी जात होत्या. गगन विहार सोसायटीच्या समोर देविदास माळी यांच्या घराच्या बाजूला समोरून दुचाकीवर अचानक आलेल्या एका अनोळखी तरुणाने गळ्यातील सोन्याचे जवळपास साडेतीन तोळ्यांचे (अंदाजित किंमत १ लाख ८० हजार) मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळून गेला.

यावेळी घाबरून गेलेल्या शिक्षिका देशमुख यांना चक्कर आल्याने मोटारसायकलचा नंबर पाहता आला नाही. जोरजोरात ओरड केली असता लोक धावून आले, पण तोपर्यंत चोरटा पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शैलजा कुलदीप देशमुख यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three-and-a-half tola chain snatched from teacher's neck, Latur incident