दुष्काळात तेरावा; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:29+5:302021-06-29T04:14:29+5:30
सामाजिक न्याय विभाग कार्यालयाअंतर्गत शिष्यवृत्तीचा एकही अर्ज प्रलंबित नाही. महाविद्यालय स्तरावर काही अर्ज प्रलंबित आहेत. त्यांनी त्रुटीची पूर्तता करून ...

दुष्काळात तेरावा; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज!
सामाजिक न्याय विभाग कार्यालयाअंतर्गत शिष्यवृत्तीचा एकही अर्ज प्रलंबित नाही. महाविद्यालय स्तरावर काही अर्ज प्रलंबित आहेत. त्यांनी त्रुटीची पूर्तता करून सदर अर्ज सादर करावेत. वारंवार त्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे. एससी प्रवर्गातून १२ हजार ८ आणि व्हीजेएनटी ओबीसी प्रवर्गातून १२ हजार ७९८ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - एस.एन. चिकुर्ते, सहायक आयुक्त समाजकल्याण, लातूर.
विद्यार्थी म्हणाले, शिष्यवृत्ती द्या
लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद होते. तरीही ऑनलाईन अर्ज सादर केले. महाविद्यालयाच्या लॉगिंग आयडीवर अर्ज प्रलंबित राहिले. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागात उशिरा गेले. त्यामुळे शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही.
कोरोनामुळे महाविद्यालय बंदच आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याच्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही, त्याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती मंजूर झाली की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. शिष्यवृत्तीची मिळण्याची प्रतीक्षा आहे.