राचन्नावाडीत एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली

By राजकुमार जोंधळे | Updated: June 29, 2024 20:22 IST2024-06-29T20:22:19+5:302024-06-29T20:22:30+5:30

साडेतीन लाखांचे साेन्या-चांदीचे दागिने लंपास...

Thieves broke into three houses in Rachannawadi in one night | राचन्नावाडीत एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली

राचन्नावाडीत एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली

राजकुमार जाेंधळे / उदगीर (जि. लातूर) : राचन्नावाडी (ता.चाकूर) येथे चाेरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फाेडल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमरास घडली. चाेरट्यांनी ९ ताेळे साेन्याचे दागिने, राेकड असा एकूण ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सूर्यकांत राजाराम चिंचोले (वय ६१, रा. राचन्नावाडी ता. चाकूर) यांच्या चाेरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास घराच कडी-कोयंडा तोंडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत १ लाख ७६ हजार) आणि ६९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले, तर फिर्यादीच्या भावाच्या घरातील कपाटातून अडीच तोळे सोन्याचे दागिने (किंमत १ लाख) आणि गावातीलच बालाजी गोविंद भंडे यांच्या घरातील २ तोळे सोन्याचे दागिने (किंमत ९४ हजार ५००) असे एकूण ३ लाख ५६ हजार रुपये आणि चांदी ११३ ग्रॅम वजनाचे दागिने (७ हजार) असा ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Thieves broke into three houses in Rachannawadi in one night