शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
2
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
3
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
4
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
5
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
6
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
7
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
8
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
9
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
10
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
11
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
12
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
13
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
14
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
15
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
16
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
17
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
18
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
19
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
20
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:32 IST

विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली. 

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानानंतर भाजपावर टीका झाली. रवींद्र चव्हाणांनी देशमुख कुटुंबीयांची माफी मागितली. पण, ऐन निवडणुकीत चव्हाणांनी विधान करून केलेली चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुधारली. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरमधील सभेत या विधानावर सविस्तर भूमिका मांडली. 

लातूर महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरून वादंग उठलेले असतानाच फडणवीसांची ही सभा झाली. या सभेतून फडणवीसांनी वादावर पडदा टाकला. 

लातूरच्या भूमीने महाराष्ट्राला नेतृत्व दिले -फडणवीस

लातुरच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लातूर ही एक अशी भूमि आहे की, जिने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले. चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्षपदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा गृहमंत्री असा प्रवेश केला."

"राजकारणात अशा प्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरला एक वेगळी ओळख असतील, ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील. खऱ्या अर्थाने विलासराव देशमुख हे असे नाव आहे, जे पक्षाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. म्हणून आपण त्यांचा आदर करतो. हे सांगताना माझ्या मनात कोणताही संकोच नाही", असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

रवींद्र चव्हाणांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले

"दोन दिवसांपूर्वी याठिकाणी काही संभ्रम निर्माण झाला, गोंधळ झाला. आमचे अध्यक्ष याठिकाणी आले होते. त्यांना बोलायचं होतं, राजकीय दृष्ट्‍या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे. पण, कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे", असे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर केले. 

फडणवीस पुढे म्हणाले की, "मी जाहीरपणे सांगतो, आमची लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते", असे म्हणत फडणवीसांनी झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis clarifies Chavan's statement about Vilasrao Deshmukh, praises his contribution.

Web Summary : During a Latur rally, Fadnavis addressed Chavan's controversial remark about Vilasrao Deshmukh. While acknowledging the political rivalry with Congress, Fadnavis emphasized Deshmukh's significant contribution to Maharashtra and expressed respect for the late leader, attempting to defuse the situation.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपा