सामान्य वाचक आणि तरुणांमध्ये संवाद व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:41+5:302021-06-25T04:15:41+5:30
लातूर : समाजातील कालबाह्य मुल्ये आणि तत्वे नाकारून पुरोगामी मुल्ये व तत्वे स्वीकारण्याचे बौद्धिक साहस, समाजप्रबोधन पुस्तिकामालेच्या माध्यमातून होईल. ...

सामान्य वाचक आणि तरुणांमध्ये संवाद व्हावा
लातूर : समाजातील कालबाह्य मुल्ये आणि तत्वे नाकारून पुरोगामी मुल्ये व तत्वे स्वीकारण्याचे बौद्धिक साहस, समाजप्रबोधन पुस्तिकामालेच्या माध्यमातून होईल. त्यासाठी सामान्य वाचक आणि तरुणांमध्ये वैचारिक संवाद व्हावा, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी येथे केले. स्वारातीम विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि त्रैमासिक विचारशलाका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्वज्ञान’ या पुस्तिकेच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. पी. विठ्ठल उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, समाज शिक्षण पुस्तिकामाला हा उपक्रम विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्यावतीने सुरू केला आहे. त्याचा समाजातील युवावर्गाला नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला संतोष गेडाम, डॉ. विवेक घोटाळे, डॉ. अनिल जायभाये, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिणे, डॉ. संजय वाघमारे, डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ. अमन बगाडे, डॉ. राजेसाहेब मारडकर, डॉ. वेदप्रकाश डोणगावकर, डॉ. रोहित गायकवाड, डॉ. नारायण कांबळे, उत्तम मांजरमकर, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. माधव कांबळे, विवेक सौताडेकर, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. जयद्रथ जाधव, बाळ होळीकर, डॉ. संजय गवई उपस्थित होते.
मूलगामी चिंतनातून सामाजिक क्रांती
आजचे बौद्धिक व शैक्षणिक पर्यावरण लक्षात घेता वंचित समाज घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचले नाही. ते पोहोचविण्यासाठी जबाबदारी बुद्धिवंत आणि राज्यकर्त्यांची आहे. मूलगामी चिंतनातूनच सामाजिक क्रांती व उन्नती होऊ शकते. त्यासाठी वैचारिक मानसिकता सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार म्हणाले.