औसा तालुक्यातील येळवट येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत किल्लारीसह भूकंप पुनर्वसित गावातील ३० खेडी पाणीपुरवठा योजनेच्या २८ कोटी ५८ लाख खर्चाच्या पुनरुजीवन टप्पा २ कामाच्या प्रारंभानिमित्त ते रविवारी बोलत होते. या वेळी आमदार अभिमन्यू पवार, माजी आ. पाशा पटेल, सुशीलदादा बाजपेयी, अरविंदराव कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, संताजी चालुक्य, संजय कुलकर्णी, प्रकाश पाटील, जयपाल भोसले, अश्विनीताई घाडगे, संयोजक माजी जि.प. सदस्य बंकट पाटील, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशनी जाधव, युवराज बिराजदार, सरपंच रमेश कांबळे, उपसरपंच शिवाजी जाधव उपस्थित होते.
माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ८ हजार पाणी योजनांची कामे अर्धवट होती. ही कामे आमची सत्ता आल्यावर पूर्ण केली. या वेळी माजी आ. पाशा पटेल म्हणाले, आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले नाही. मात्र, आ. अभिमन्यू पवार यांनी प्रत्येक गावाचा दौरा करून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड होत आहे. या वेळी बांबू लागवडीविषयी माहिती दिली.
आ. अभिमन्यू पवार म्हणाले, औसा शहरासह ३० खेडी, खरोसा व मुरूड पाणीपुरवठा योजनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिला. निधी कमी पडू नये म्हणून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भरीव मदत दिली. औसा शहरातील नागरिकांची तेरणा धरणातून पाण्याची मागणी असताना ही योजना तेव्हा का सुरू करता आली नाही, असा सवाल उपस्थित केला. प्रास्ताविक काकासाहेब मोरे यांनी केले.