चॅनेल गेटचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख रक्कम, दागिन्यांची चोरी

By संदीप शिंदे | Updated: September 30, 2022 19:18 IST2022-09-30T19:17:59+5:302022-09-30T19:18:13+5:30

७० हजारांचा मुद्देमाल लंपास : भादा पोलिसांत अज्ञातावर गुन्हा

Theft of cash, jewelery from the locker by breaking the lock of the channel gate | चॅनेल गेटचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख रक्कम, दागिन्यांची चोरी

चॅनेल गेटचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख रक्कम, दागिन्यांची चोरी

लातूर : औसा तालुक्यातील मातोळा येथे घराच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४० हजार रुपये व ३० हजार किंमतीचे दीड तोळ्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची २९ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी भादा पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नाेंद आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी महादेव विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या मातोळा येथील घराच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरुमची कडी काढून लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४० हजार व ३० हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण लंपास केले. रोख रक्कम व सोने असे दोन्ही मिळून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असून, याप्रकरणी महादेव सुर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाडकर करीत आहेत.

 

Web Title: Theft of cash, jewelery from the locker by breaking the lock of the channel gate