निलंगा तालुक्यात वीज पडून महिला जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 22:47 IST2023-04-14T22:46:13+5:302023-04-14T22:47:26+5:30

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह निटूर, येरोळ परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

The woman died on the spot due to lightning | निलंगा तालुक्यात वीज पडून महिला जागीच ठार 

निलंगा तालुक्यात वीज पडून महिला जागीच ठार 

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह निटूर, येरोळ परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, वीज पडून एक महिलाचा मृत्यू झाला आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, तगरखेडा, हालसी, सावरी, वांजरखेडा, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा जोरदार वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. औराद शहाजानी येथील व्यापारी माधव पाटील व त्यांची पत्नी रेखा माधव पाटील (४२) हे आपले मूळ गाव असलेल्या शेजारील कर्नाटक सीमा भागातील वांजरखेडा (ता. भालकी) येथील शेतात गेले होते. शेतातील उसाला पाणी देताना अचानक वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे रेखा पाटील या झाडाखाली थांबल्या असता वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे.
 

Web Title: The woman died on the spot due to lightning