वाहनाने तरुणांना उडवले; एक जागीच ठार, दुसरा गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: August 10, 2023 05:17 IST2023-08-10T05:16:52+5:302023-08-10T05:17:00+5:30

लातूर - औसा  महामार्गावर रात्री १० वाजताची घटना

The vehicle blew up the youth; One killed on the spot, the other seriously | वाहनाने तरुणांना उडवले; एक जागीच ठार, दुसरा गंभीर

वाहनाने तरुणांना उडवले; एक जागीच ठार, दुसरा गंभीर

औसा (जि. लातूर) : लातूरहून गावाकडे निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लातूर- औसा महामार्गावर बुधाेडा गावानजीक घडली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, एक तरुण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, काळमाथा येथील अभिषेक अंगद गायकवाड (२३) हा बुधवारी रात्री लातूरहून गावाकडे दुचाकीवरून (एमएच २५ एसी ०२५८) जात हाेता. महामार्गावरील बुधाेडानजीक पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला रात्री १० वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली. यात अभिषेक जागीच ठार झाला, तर सोबतचा कुणाल गायकवाड (२२) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून वाहनचालक हा पसार झाला असून, औसा पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

कुटुंबावर काेसळला 
दु:खाचा डाेंगर...
मयत अभिषेक गायकवाड आणि जखमी कुणाल गायकवाड हे लातूर येथे लाइट फिटिंगचे काम करतात. अभिषेक हा एकुलता एक असल्याने परिवारावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. दिवसभर काम करून रात्री ते गावाकडे निघाले असताना त्याच्या दुचाकीला वाहनाने उडवले.

Web Title: The vehicle blew up the youth; One killed on the spot, the other seriously

टॅग्स :Accidentअपघात