पाया खालचा खडक घसरला अन् अनर्थ झाला; दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

By हरी मोकाशे | Updated: February 3, 2023 18:07 IST2023-02-03T18:06:35+5:302023-02-03T18:07:01+5:30

विहिरीतून बाटलीत पाणी घेताना दोघेही बुडाले

The rock foundation fell and disaster ensued; Two siblings drowned in a well | पाया खालचा खडक घसरला अन् अनर्थ झाला; दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

पाया खालचा खडक घसरला अन् अनर्थ झाला; दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

देवणी (जि. लातूर) : पाणी घेण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोघा भावंडांच्या पायाखालील खडक घसरल्याने तो गेला आणि दोघेही बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी देवणी येथे घडली आहे.

नरसिंग युवराज चव्हाण (३०) व त्याचा चुलत भाऊ संगमेश्वर संजय चव्हाण (१८, दोघेही रा. देवणी) असे मयत भावंडांची नावे आहेत. देवणी येथील नरसिंग चव्हाण व त्याचा चुलत भाऊ संगमेश्वर चव्हाण हे दोघे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी प्रात:विधीसाठी जवळच्या शेतावर गेले होते. दरम्यान, बाटलीत पाणी घेण्यासाठी एकमेकांचा हात धरून विहिरीत उतरले. पाणी घेताना त्यांच्या पायाखालील खडक घसरला आणि तोल गेला. त्यामुळे ते दोघेही विहिरीत पडून मृत्यूमुखी पडले.

दरम्यान, बऱ्याच वेळापासून मुले येत नसल्याचे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा हे दोन्ही भावंडे विहिरीत पडल्याचे आढळून आले. याप्रकरणी अंकुश युवराज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. उस्तुरगे हे करीत आहेत.

Web Title: The rock foundation fell and disaster ensued; Two siblings drowned in a well