उधारी परत देतो म्हणून व्यापाऱ्यास बाेलावले, येताच मारहाण करुन लुटले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 23, 2023 12:27 IST2023-08-23T12:26:58+5:302023-08-23T12:27:38+5:30

लातुरातील घटना; या प्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The merchant was beaten for returning the loan, beaten and robbed as soon as he arrived | उधारी परत देतो म्हणून व्यापाऱ्यास बाेलावले, येताच मारहाण करुन लुटले

उधारी परत देतो म्हणून व्यापाऱ्यास बाेलावले, येताच मारहाण करुन लुटले

लातूर : शहरातील एका व्यापाऱ्याला तुमचे राहिलेले पैसे द्यायचे आहेत, असे म्हणून बाेलावून घेतले. त्यास मारहाण करुन, त्याच्याच खिशातील २० हजाराची राेकड आणि मनगटी घड्याळ काढून घेतल्याची घटना लातुरात मंगळवारी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, विलीन कमलाकर बिराजदार (रा. लातूर) हे व्यापारी असून, त्यांना दाेघांनी संगणमत करुन, फाेनवरुन तुझे राहिलेले पैसे द्यायचे आहेत, लवकर ये म्हणून त्या बाेधी चाैकात बाेलावून घेतले. ताे जवळ येताच त्याच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. त्याच्या खिशातील २० हजार रुपये राेख, मनगटी घड्याळ काढून घेवून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The merchant was beaten for returning the loan, beaten and robbed as soon as he arrived