जुन्या भांडणातून दरवाजा तोडत चौघे घरात घुसले; एकास सळईने केली बेदम मारहाण

By हरी मोकाशे | Updated: October 7, 2022 19:27 IST2022-10-07T19:26:46+5:302022-10-07T19:27:19+5:30

फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.

the four entered the house; One was brutally beaten by a rod | जुन्या भांडणातून दरवाजा तोडत चौघे घरात घुसले; एकास सळईने केली बेदम मारहाण

जुन्या भांडणातून दरवाजा तोडत चौघे घरात घुसले; एकास सळईने केली बेदम मारहाण

लातूर :  अहमदपूर तालुक्यातील हंगेवाडी येथे एकाच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांत चौघांविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, हंगेवाडी येथील आरोपी यशवंत हंगे, अर्जुन हंगे, गोपाळ हंगे, ज्ञानेश्वर हंगे या चौघांनी संगनमत केले. ते गावातील फिर्यादी विलास हंगे हे शेतातून घरी जाताना डोक्यात लोखंडी सळईने मारून जखमी केले. तसेच गुरुवारी रात्री विलास हंगे हे जेवण करून झोपले असता वरील आरोपींनी घराचा दरवाजा तोडून घरात घुसून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विविध कलमान्वये किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय चंदू गोखरे करीत आहेत.
 

Web Title: the four entered the house; One was brutally beaten by a rod