भरधाव टेम्पोच्या धडकेत आडत व्यापारी जागीच ठार, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 20:26 IST2022-09-20T20:25:04+5:302022-09-20T20:26:59+5:30
नळेगाव (जि. लातूर ) : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी ...

भरधाव टेम्पोच्या धडकेत आडत व्यापारी जागीच ठार, एक गंभीर
नळेगाव (जि. लातूर) : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शिरुर अनंतपाळ तालुक्यातील रापका ते आरी मोड मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील जखमीला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील प्रसिद्ध आडत व्यापारी नागनाथ पद्माकर बिराजदार (वय ४५) आणि आडत व्यापारी संजय मधुकर शिंगडे (वय ४५ रा. देवंग्रा जि. लातूर) हे मोटारसायकल वरुन ढोबळेवाडी येथे गोड जेवणाच्या कार्यक्रमाला जात होते. दरम्यान, रापक ते आरी मोड दरम्यानच्या वळणार भरधाव असलेल्या टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या अपघातात मोटारसायकल चालक नागनाथ बिराजदार हे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले संजय मधुकर शिंगडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रापका ते आरी मोड मार्गावरील धोकादायक असलेल्या वळणावर मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.