नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा २४ तासानंतर सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा

By हरी मोकाशे | Updated: August 21, 2023 19:14 IST2023-08-21T19:13:12+5:302023-08-21T19:14:10+5:30

औराद शहाजानीची घटना, पोहोण्याच्या प्रयत्नात बुडाला पाण्यात

The body of the grandson who drowned in the river was found after 24 hours | नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा २४ तासानंतर सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा

नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा २४ तासानंतर सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा

औराद शहाजानी (जि. लातूर) : तेरणा नदीपात्रात पोहोण्याचा प्रयत्न करताना बुडालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर २४ तासानंतर सोमवारी दुपारी १ वाजता आपत्ती व्यवस्थापनच्या पथकास सापडला. नातवाचा मृतदेह पाहून आजोबांनी हंबरडाच फोडला.
शाम व्यंकटराव जाधव (१८, रा. तळभाेग, ता. बसवकल्याण, हमु. गुंजरगा, ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे.

शाम जाधव हा मुळचा रहिवासी कर्नाटकातील तळभोग येथील आहे. त्याचे आई- वडिल पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे तो मामाकडे शिकण्यासाठी राहत होता. सध्या तो निलंग्यातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी तो गुजंरगा येथील मामाच्या शेतात आजाेबा आणि मामाच्या मुलगासाेबत गेला हाेता. आजाेबांनी तेरणा नदी पाञात म्हैस धुतली आणि ते म्हैस चारत पुढे गेले. तेव्हा मामाचा मुलगा गणेश लिंबाजी शिंदे हा नदीपाञातील लाेखंडी कलईत बसून गावाकडे गेला. दरम्यान, शाम जाधव हा नदीच्या किनाऱ्यालगत पोहत होता. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे पोहेकॉ. विष्णू गित्ते, पाेकॉ. अलि शेख, पाेलिस पाटील माेहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे आदींनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने शाेध माेहीम राबविली. तेव्हा दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून नातेवाईक आक्रोश करीत होते.

Web Title: The body of the grandson who drowned in the river was found after 24 hours