शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट-पाटोदा मार्गावर भीषण अपघात; दाेन गंभीर, 'डेथ ट्रॅप' मानले पाटाेद्याचे जाणारे वळण धाेकादायक

By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2026 05:36 IST

जळकोट-उदगीर महामार्गावरील पाटोदा (बु.) येथील धोकादायक वळणावर दुचाकीचा साेमवारी भीषण अपघात झाला.

जळकोट (जि. लातूर) : जळकोट-उदगीर महामार्गावरील पाटोदा (बु.) येथील धोकादायक वळणावर दुचाकीचा साेमवारी भीषण अपघात झाला. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी उदगीर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

उत्तम एकनाथराव वाघमारे (रा. शिवाजीनगर तांडा) आणि मिलिंद गायकवाड (रा. आतनूर) हे दोघे जळकोट येथून शिवाजीनगर तांड्याकडे दुचाकीवरून जात हाेते. पाटोदानजीक धोकादायक वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. परिणामी, भरधाव दुचाकी थेट रस्त्यालगतच्या लोखंडी कठड्याला जाऊन आदळली अन् खड्ड्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच काँग्रेसचे सचिन केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना उदगीर येथे दाखल केले.

वळण रस्त्यावर अनेक अपघात...

पाटोदा येथील वळण रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे वळण अजून कितीजणांचा बळी घेणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या वळणावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal Accident on Jalkot-Patoda Road; Dangerous Turn Claims Victims

Web Summary : A severe accident occurred on the Jalkot-Patoda road near Patoda, injuring two seriously. The dangerous turn is known as a 'death trap'. Locals demand immediate safety measures from highway authorities due to frequent accidents.
टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर