यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापाैर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, अत्यावश्यक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी १२० मेट्रिक टन क्षमतेचे लिक्विड टँक निर्माण करण्यात येत आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी सात ठिकाणी पीएसए संच बसविण्यात येत आहेत. कोविडच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज आहे, असेही ते म्हणाले. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ हजार लिटर प्रतिमिनिट क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. यासाठी सर्व योजना आखल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ९० हजार लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली असून, स्पुतनिक कंपनीची लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.
विविध पुरस्कारांचे वितरण...
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण तसेच लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती.