टेम्पोची दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक, उपचारास नेताना दुचाकीस्वाराचा मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: January 30, 2024 18:43 IST2024-01-30T18:43:03+5:302024-01-30T18:43:47+5:30
गंभीर जखमीस उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना वाटेतच झाला मृत्यू

टेम्पोची दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक, उपचारास नेताना दुचाकीस्वाराचा मृत्यू
उदगीर : परिसरातील हाकनकवाडी शिवारात अहमदपूर रोडवर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोने दुचाकीचालकास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर-अहमदपूर रोडवर हाकनकवाडी शिवारातील बालाजी फड यांच्या शेताजवळ आयशर टेम्पो (एमएच २४ एबी ८५४१) च्या चालकाने दुचाकी (एमएच १४ डीयू १५३१) वर जाणारे सतीश त्र्यंबक सूरनर यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादीचे नातेवाईक धोंडीराम माधव करले यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पोचालकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. व्यंकट शिरसे करीत आहेत.