धडक देवून पाडले म्हणत टेम्पो चालकास भर रस्त्यात सहा जणांची बेल्टने मारहाण
By राजकुमार जोंधळे | Updated: September 19, 2022 20:14 IST2022-09-19T20:10:12+5:302022-09-19T20:14:40+5:30
थांब तुला दाखवताे म्हणून फाेन करुन इतर साथीदारांना बाेलावून घेतले. त्यानंतर संगमत करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

धडक देवून पाडले म्हणत टेम्पो चालकास भर रस्त्यात सहा जणांची बेल्टने मारहाण
लातूर : आम्हाला धडक मारुन पाडलाय म्हणून शिवीगाळ करुन, एकाला पाच ते सहा जणांनी बेल्टने जबर मारहाण केल्याची घटना लातुरातील राजीव गांधी चाैक ते छत्रपती चाैक मार्गावर शनिवार, १७ सप्टेंबर राेजी घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नासीर फकीरसाब शेख (वय ३५ रा. साळे गल्ली, म्हैसूर काॅलनी, लातूर) हे चालक आहेत. त्यांच्या टेम्पाेसमाेर राॅग साईड येवून माेटारसायकलसह पडले. नंतर त्यातील एकाने तू आम्हाला धडक मारुन पाडलास म्हणून शिवीगाळ करु लागला. दरम्यान, थांब तुला दाखवताे म्हणून फाेन करुन इतर साथीदारांना बाेलावून घेतले. त्यानंतर संगमत करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
शिवाय, मनाेज धाेतरे याने बेल्टने पाठीत, उजव्या हातावर, डाेक्यावर आणि ताेंडावर मारुन जखमी केली. असे पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जखमी फिर्यादीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.