क्षात्रतेज वडणेचे स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST2021-01-15T04:16:56+5:302021-01-15T04:16:56+5:30

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कर्ज मेळावा लातूर : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने १७ जानेवारी रोजी कर्ज मेळावा आयोजित केला आहे. ...

Success in field competition | क्षात्रतेज वडणेचे स्पर्धेत यश

क्षात्रतेज वडणेचे स्पर्धेत यश

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कर्ज मेळावा

लातूर : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने १७ जानेवारी रोजी कर्ज मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज तसेच वाहन कर्ज, गृह कर्ज, डॉक्टर्स स्पेशल कर्ज, सोने तारण कर्ज आदी कर्ज आकर्षक व्याज दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्राहकांनी सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी १७ जानेवारी रोजी गंजगोलाई, शिवाजी चौक, खाडगाव रोड व वसंतराव नाईक चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजय देशमुख यांचा सत्कार

लातूर : मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विजय देशमुख यांचा मळवटी येथील विद्यालयात मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर गरड, उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाफरअली सय्यद, विलास गिरी, मंजुषा शिंदे, चंद्रकांत चोपले, रंगनाथ माळी यांची उपस्थिती होती.

नागरी हक्क कृती समितीतर्फे अभिवादन

लातूर : लातूर शहर पूर्वभाग नागरी हक्क कृती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाधान सूर्यवंशी, आनंद सोनवणे, दीपक गंगणे, शंकर जाधव, मनोहर शिंदे, बाबासाहेब बनसोडे, भगवेश्वर धनगर, विशाल मोकाशे, गौतम ससाणे आदींसह लातूर शहर पूर्वभाग नागरी हक्क कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिन आढावा बैठक

लातूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, गणेश महाडिक यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी अपर जिल्हाधिकारी लोखंडे यांनी दिली.

लातूर शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरूच

लातूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरींचे सत्र सुरूच आहे. शहरातील बांधकाम भवन तसेच गंजगोलाई भागातून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना गेल्या तीन दिवसांत घडल्या आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. मात्र आरोपींचा सुगावा लागलेला नाही. दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी

लातूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. शासनाने तरतूद केली असून, वितरण झाले नाही. त्यामुळे आठ दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, अन्यथा महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाीर संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

तुती लागवडीसाठी शासनातर्फे अनुदान

लातूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, किटक संगोपन, गृह बांधकाम व किटक संगोपन साहित्य या करिता शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. साधारण लाभार्थ्यांना २ लाख २० हजार तर अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना २ लाख ६४ हजार रुपये अनुदान मिळते. या योजनेचा बहुभूधारक लाभार्थी लाभ घेऊ शकतात. रेशीम शेतीमध्ये एक महिन्यात जास्त उत्पन्न मिळते, असे जिल्हा रेशीम अधिकारी एन.बी. बावगे यांनी सांगितले.

क्रीडा पुरस्कारासाठी अभिप्राय पाठवावेत

लातूर : राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू पुरस्कार दरवर्षी दिले जातात. याबाबतची नियमावली शासन निर्णयानुसार निर्गमित केलेली आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावीत आहे. त्यामुळे सूचना व अभिप्राय २२ जानेवारीपर्यंत मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर

लातूर : ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राहणारे बहुतांश मतदार शहरातील आस्थापनांमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्या जाहीर

लातूर : प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये १२ जानेवारी, १३ सप्टेंबर, २ नोव्हेंबरचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, कोषागारे, सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना हा नियम लागू राहणार आहे.

राष्ट्रवादी माथाडी युनियन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लातूर : राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील, बबन भोसले, अनिल नल्ले, सिद्धनाथ रिद्धेवाड, लिंबराज वाघमारे, पवन घोडके, लखन साबळे, वसंत श्रीमंगले, भास्कर सोनवणे, उत्तम सोनवणे, परमेश्वर रसाळ, नवनाथ आदमाने, तुषार ससाणे, गजानन खमितकर, समीर शेख, अभिलाष पाटील, डी. उमाकांत उपस्थित होते.

Web Title: Success in field competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.