उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांचे मूळगावी भव्य मिरवणुकीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:17 IST2020-02-01T19:16:33+5:302020-02-01T19:17:36+5:30

राज्यातील शेकडो मल्लांची उपस्थिती 

Sub-Maharashtra Kesari Shailesh Shelke welcomed the hometown with a grand procession | उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांचे मूळगावी भव्य मिरवणुकीने स्वागत

उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांचे मूळगावी भव्य मिरवणुकीने स्वागत

ठळक मुद्देराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार

लातूर : महाराष्ट्र केसरीचा उपविजेता शैलेश शैळके पहिल्यांदाच औसा तालुक्यातील टाका या मुळगावी आला असल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे़

टाका येथे पुण्याहून शेकडो मल्ल दाखल झाले आहेत़ यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील शेकडो मल्ल मित्र डॉल्बीवर थिरकले. यावेळी शैलशचे प्रशिक्षक तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, शरद पवार, विशाल माने, ज्ञानेश्वर गोचडे, विक्रम कुºहाडे, उपमहाराष्ट्र केसरी मुन्ना झुंजूरगे, विभागीय सचिव वामन गाते, कुस्तीप्रशिक्षक सुरेंद्र कराड, विठ्ठल पवार, सरपच रामचंद्र शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतिबा गोरे, अप्पासाहेब शिंदे, देविदास देशमुख, राजाभाऊ शेळके,  प्रा़ आशिष क्षिरसागर, शिवशंकर भावले, शातांप्पा तोळमारे,कौस्तुभ डाफळे आदींसह कुस्तीपट्टू, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे़

(उर्वरित वृत्त थोड्याच वेळात)

Web Title: Sub-Maharashtra Kesari Shailesh Shelke welcomed the hometown with a grand procession