येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव रमेश बगदुरे, बस्वराज वलांडे, मडोळय्या मठपती, दगडू गिरबने, प्राचार्य डॉ.अजितसिंह गहेरवार यांची उपस्थिती होती. संदीप कामत म्हणाले, विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. अपयशाने खचून न जाता शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त रहावे. जीवनात नेहमीच आपले आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करावा. जिद्द, सातत्य, कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. अध्यक्षीय समारोपात वलांडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष बोरोळे, अंबिका पंढरपूरे, तमन्ना बडूरे, रोहिणी खामकर, वैष्णवी गायकवाड, सुप्रिया शिवणे, धनश्री सोलापूरे, गौरी कल्याणे, रितू सूर्यवंशी, राहुल शिंदे, प्रीती कावडवाड, धनश्री गायकवाड, देवकन्या चव्हाण या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार यांनी व सूत्रसंचालन डाॅ. शंकर कल्याणे यांनी केले. याप्रसंगी प्रा.अनंत गोदरे, प्रा.दुर्गादास सबनीस, डाॅ.प्रदीप पाटील आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अंगभूत कौशल्यांचा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST