सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त वाढली तरी लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 9, 2023 18:43 IST2023-08-09T18:42:50+5:302023-08-09T18:43:21+5:30

विद्यार्थ्यास लुटणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

Student robbed at knifepoint in Latur city; Cash, mobile phone seized | सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त वाढली तरी लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले

सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त वाढली तरी लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले

लातूर : बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना लातुरातील उद्योग भवन परिसरात घडली. रोकड आणि मोबाईल फोन हिसकावून दोघांनी पळ काढला. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. मात्र एकाच घटनेत शिवजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूर शहरात जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. परिणामी, उद्योग भवन परिसरातील खासगी शिकवणीला मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यांच्या सुरक्षेसाठी परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शिवाय, पोलिसांची गस्तही सुरु असते. एवढे असतानाही दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मन्मथ देशमुख (वय १७ रा. धाराशिव) याला सिद्धार्थ चौकात अडवले. यावेळी त्यांनी चाकूचा धाक दाखवत रोख ९ हजार ७०० रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावत पळ काढला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोघा अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Student robbed at knifepoint in Latur city; Cash, mobile phone seized