दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
By संदीप शिंदे | Updated: November 21, 2023 19:14 IST2023-11-21T19:13:40+5:302023-11-21T19:14:01+5:30
तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी आंदोलन

दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
उदगीर : तालुक्यातील तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी मंडळातील शेतकऱ्यांनी मंगळवारी तोंडार पाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले.
तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा व या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्यासह सर्व सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनात उदगीरचे माजी आ. मनोहर पटवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुन्ना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, तोंडार ग्रामपंचायतचे सरपंच भरत कोचेवाड, माजी उपसरपंच निळकंठ बिरादार, माधव पटवारी, शिवलिंग नावंदे, माधव पाटील, आनंदराव मालोदे, विलास खिंडे, सुका दाजी, बसवराज पांडे, पदमीनबाई पांडे, निर्मला लासुरे, यांच्यासह तोंडार महसूल मंडळाच्या गावांतील शेतकरी सहभागी होते.