एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:56+5:302021-07-24T04:13:56+5:30
एसटीला स्पीड लाॅक, ट्रॅव्हल्स मात्र सुसाट... महामंडळ प्रशासनाकडून प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत लांब पल्ल्याच्या, रातराणी बसला वेगमर्यादा आहे. त्यासाठी ...

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?
एसटीला स्पीड लाॅक,
ट्रॅव्हल्स मात्र सुसाट...
महामंडळ प्रशासनाकडून प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत लांब पल्ल्याच्या, रातराणी बसला वेगमर्यादा आहे. त्यासाठी एसटी बसला स्पीड लाॅक बसविण्यात आला आहे. उलट खाजगी वाहनांना कुठलीच वेग मर्यादा नाही. परिणामी, वेगवान प्रवास असला तरी ताे अरक्षित आहे. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्स मात्र सुसाट धावत आहेत.
वेळ, सुरक्षेला प्राधान्य...
लातूर विभागातील पाच आगारांतून धावणाऱ्या बसला वेळ आणि प्रवासी सुरक्षा महत्त्वाची आहे. फलाटावरून मार्गस्थ हाेणारी बस ही निर्धारित वेळत शेवटच्या थांब्यावर जाते. यातून प्रवाशांना सुरक्षित आणि वेळत प्रवास करता येताे. शिवाय, बसची वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. यातून अपघाताच्या घटना टाळण्याचा प्रयत्न महामंडळाचा असताे. प्रवासी सुरक्षा हाच आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे.
- सचिन क्षीरसागर, विभागा नियंत्रक, लातूर
आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास...
शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना लालपरी महत्त्वाचा आधार वाटते. एस.टी. बसचा प्रवास सुरक्षित आहे. गाव, तालुका, खेड्या-पाड्यांसह वाडी-तांड्यापर्यंत धावणारी बस सामान्यांचा श्वास आहे. बस गावात आली नाही तर प्रवासात अनेक अडचणी येतात. काहींना पायपीट करावी लागते. सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला आमचे प्राधान्य आहे.
- अंगद किनीकर, प्रवासी
आरामदायी प्रवासापेक्षा सुरक्षित प्रवास अधिक महत्त्वाचा आहे. खेड्यापाड्यातील प्रवाशांच्या संकटात लालपरीच धावून येते. खाजगी ट्रॅव्हल्सचा प्रवास असुरक्षित वाटताे. खाजगी वाहनधारकांची मनमानी आणि असुरक्षित प्रवास हा प्रवाशांना त्रासदायक वाटताे. शिवाय, तिकिटातील मनमानी केली जाते. तर लालपरी आपली हक्काची आणि सुरक्षित वाटते.
- गंगाराम मुंगनाळे, प्रवासी