आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी
By राजकुमार जोंधळे | Updated: August 3, 2022 18:14 IST2022-08-03T18:13:33+5:302022-08-03T18:14:18+5:30
मुलगा आणि पत्नीने आपली तक्रार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्याने पाेलिसांनी मुलाला ताब्यात घेत खाक्या दाखविला.

आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी
लातूर : दारु पिवून आईला सतत छळणाऱ्या बापाचा काटा काढणाऱ्या १९ वर्षीय मुलासह त्याच्या मित्राला गातेगाव पाेलिसांनी अटक केली आहे. लातूर तालुक्यातील चिंचाेळी (बल्लाळनाथ) येथील या घटनेने एकच खळबळ उडाली हाेती. दरम्यान, या खुनाचा तीन दिवसानंतर पाेलिसांनी उलगडा करत, घटनेचे अखेर बिंग फाेडले. दरम्यान, लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेघांनाही ५ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले, चिंचाेली (ब.) येथील नागनाथ खंडू काळे (वय ४९) हा सतत दारु पिवून पत्नी आणि मुलला सतत मारझाेड करुन छळत हाेता. दरम्यान, या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी अनेकदा माहेरी गेली हाेती. राेजच्या भांडणाला, मारझाेडीला त्रस्त झालेल्या मुलाने दाेन महिन्यापूर्वीच आपल्या जन्मदात्या बापाचा काटा काढण्याची माेहीम आखली हाेती. याबाबत त्यांने आपल्या एका मित्राशी चर्चा करुन शांत डाेक्याने कट रचला. आई आजाेळी गेली हाेती. घरात काेणीच नाही, याचा फायदा घेण्याचे मुलाने ठरवले. नागनाथ काळे हा दारु पिवून घरात ३० जुलै राेजी झाेली गेला असता, मुलगा आकश नागनाथ काळे (१९) याने मित्र राेहित रघुनाथ पेपळे (३१) याला साेबत घेत वडील नागनाथ काळे याच्या गळ्यावर काेयत्याने सपासप वार करुन ठार मारले. या घटनेची माहिती गातेगाव पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
अधिक चाैकशी केली असता, मुलगा आणि पत्नीने आपली तक्रार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्याने पाेलिसांनी मुलाला ताब्यात घेत खाक्या दाखविला. आपणच बापाचा खून केल्याचे मुलगा आकाश याने पाेलिसांकडे कबुली दिली. दरम्यान, मुलासह त्या मित्राला पाेलिसांनी अटक करुन गुन्ह्यात वापरलेला काेयता जप्त केला. दाेघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली, अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक नंदकिशाेर कांबळे यांनी दिली. तपास सहायक पाेलीस निरीक्षक ए.बी. घाडगे करत आहेत.